सा दै बीड रिपोर्टर मधील आज १२ डिसेम्बरचा अग्रलेख
दानत...
-गणेश सावंत- 9422742810
दानत या शब्दाचा अर्थ काय? दानत या शब्दाची व्याख्या काय? दानत या शब्दाची ताकद काय? दानत या शब्दाची महती काय? दानत या शब्दात दडलयं काय? हे प्रश्न जेंव्हा पडतात, तेंव्हा वरील ङ्गोटो पाहितला की, अलगदपणे दानत या शब्दाचे यथोयोचित अर्थ, व्याख्या, ताकत, महती उमजल्याशिवाय राहत नाही. नुसता अर्थ किंवा महती उमजून येत नाही, तर संघर्षाची उर्मी जागी झाल्याशिवाय राहत नाही. संघर्ष कसा असतो? संघर्ष कशाला म्हणायचे? संघर्ष कसा करावा लागतो? संघर्ष सत्य आहे की, असत्य. संघर्ष खरा आहे की खोटा. त्याची सुरुवात कोठून करायची? आणि शेवट कसा करायचा? आणि हो, त्या शेवटाचे ङ्गलित काय असेल? याचे इत्तेनभूत उदाहरणासह सारांश हा ङ्गोटो पाहितलाच की, तुम्हा आम्हाला मिळेल. समाज जीवनापासून राजकीय जिवनापर्यंत नव्हे-नव्हे तर ग्रामीण जिवनापासून शहरी जिवनापर्यंत ज्या माणासाचा प्रवास संघर्षमय झालेला असतो. या संघर्षात तो यशाची पताका ङ्गडकवत असतो. तेंव्हा त्या माणसातला माणुसकीच्या अंशाचा अंत झाल्यागत अनुभव येतो. परंतू इथं हा अनुभव आलेला नाही. उलट जशी- जशी यशाची पताका ङ्गडङ्गडङ्गड ङ्गडकत राहिली. तशी माणुसकी या माणसामध्ये कायम जिवंत राहिली. वरचा ङ्गोटो पािहतल्यामुळे आणि या अग्रलेखाचे शिर्षक दानत हे ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या माणसाला हा लेख कोणाबद्दल लिहिला जातोय, हे सांगण्याची गरज नाही. कारण कुठलाही राजकीय वारसा नाही. घरामध्ये कोणी राजकारणामधला हस्तक नाही. तरीही एखादा माणुस गावच्या सरपंचापासून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत जो जावून पोहचतो, तो माणूस एक तर धुरंधर क्रांतीकारी अथवा सामाजिक दृष्टीकोन ठेवणारा संतच असू शकतो. बीड जिल्हा तसा भाग्यवान. जसा या देशाला, महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहास आहे. तसा त्या इतिहासाच्या पानामध्ये बहुतांश पाने हे बीड जिल्ह्याच्या इतिहासाचे असतीलच. दुर्देवाने आणखी एक इतिहासाचं पान 2014 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडेंसाठी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात लिहिलं गेलं. सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानलिये नाही बहुमता हा सिद्धांत तंतोतंत साहेबांबाबत लागू होतो. सत्य आणि असत्य याची सांगड राजकारणाबरोबर समाजकारणाशी जोडून तळागाळातल्या माणसाला उभं करर्याचं काम आणि तरुण पिढीला स्वत:च्या संघर्षातून संघर्षाबाबत माहिती देण्याचं आणि कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची उर्जा देण्याचे प्रयत्न स्व. गोपीनाथराव मुंडेंनी स्वकर्मातून आमच्या पिढीला दिले. एखाद्या शेतकर्याचं लेकरू जेंव्हा टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रिम असं म्हणत अशक्य ते शक्य करण्याचं स्वप्न पाहतं नव्हे नव्हे तर ते स्वप्न पूर्ण करतं तेंव्हा त्याच्या पावलावर चालणार्यांची संख्या तेवढीच मोठी होते आणि या संख्यात्मिक गणितामध्ये जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रात संघर्षमय माणसाच्या जिवनातल्या भुतकाळातील गोष्टी लक्षात ठेवून आमच्यासारखी पिढी आपआपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते तेव्हा त्या पिढीतल्या आणि त्या संख्यात्मिक गणितामधल्या एक एक अंकाला गोपीनाथ मुंडेंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भीष्माचार्य अनेक असतील, त्यांचे शिष्यही तेवढेच असतील परंतु शिष्य आणि भीष्माचार्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच राहील ते म्हणजे साहेब. त्याचं कारणही तसच आहे. ज्या माणसाच्या संघर्षमय जिवनाची गाथा ऐकून त्या माणसाच्या विजयी मिरवणुकांमध्ये
काळही नाचतो
अनेक वेळा काळाला अक्षरश: या संघर्षमय माणसाच्या जिवनाच्या यशोगाथेबाबत हेवा वाटला, काळाने या संघर्षमय माणसाला भीती दाखविण्यासाठी काही वेळा छोटेमोठे अपघात घडविले,पण या काळाला तेव्हा या संघर्षमय माणसाला आपल्यासोबत घेऊन जाण्याची ताकत मिळाली नाही. कारण साहेबांच्या संघर्षमय जिवनाची प्रत्येक पायरी ही सत्य आणि कर्माबरोबर स्वकर्तृत्वाने रचली गेलेली होती आणि ही प्रत्येक पायरी चढायची आणि साहेबांना सोबत घेऊन जायची क्षमता आणि शक्ती त्या काळाला नव्हती. म्हणूनच वेळोवेळी जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष सुरू केला आणि त्या संघर्षातून एक बलाढ्य नेतृत्व स्वत:च्या खांद्यावर घेतलं तेव्हा तेव्हा हा काळ गोपीनाथ मुंडेंच्या विजयी मिरवणुकीमध्ये कडेला उभा राहून मोठ्या ईर्ष्येने गोपीनाथ मुंडेंकडे पाहत असे. काय म्हणावं या माणसाला एवढा संघर्ष करण्याची ताकत याला कोणी दिली. याला एखादा देव प्रसन्न आहे का, असे एक ना अनेक प्रश्न त्या काळात पडले असतील. परंतु संघर्ष हा पाचवीला पुजल्यागत गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने आपलं जिवन जगत ती पद्धत राना-वनातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांसारखी असायची या कास्तकर्यांचे, कष्टकर्यांचे स्वप्न हेच माझे स्वप्न हे साहेब धाडसाने सांगायचे तेव्हा काळालाही वाटायचं हा आपला बाप आहे. म्हणूनच तर वेळोवेळी जेव्हा केव्हा साहेबांच्या विजयी मिरवणुका निघाल्या, गुलालाची उधळण होत राहिली तेव्हा तेव्हा साक्षात काळ मुंडेंच्या मिरवणुकीमध्ये कमरेवर हात देऊन नाचला. पण काळ तो काळच होता त्याला साहेबांचं यश बघवत नव्हतं, साहेबांजवळ येणारी माणसं त्याला पहावत नव्हती, साहेब ज्या माणसांबाबत आपलं सर्वस्वपणाला लावतात तेही काळाला खुपायचं म्हणूनच तर साहेब जेव्हा सह्याद्रीचा पर्वत ओलांडून दिल्लीच्या तक्तापर्यंत गेले तिथच आणि तिथच काळाने संधी साधली. हमखास पाठीमागे राहिलेला काळ दिल्लीच्या एका रस्त्यावर साहेबाला आडवा आला आणि गेल्या दोन वर्षापूर्वी एका छोट्याशा अपघातामध्ये काळाने साहेबांना सोबत नेले. काळ तेव्हा खिदीखिदी हसला असेल. अरे ज्या माणसाने मला उभे चार दशके स्वत:च्या विजयी मिरवणुकीमध्ये नाचायला लावलं तो दानतवीर आज मी घेऊन जातोय. याचा त्याला अभिमानही वाटला असेल, परंतु काळाने हे माहित नव्हतं तो साहेबांना घेऊन गेला, साहेब शरीराने आमच्यामध्ये नसतील परंतु साहेबांचा संघर्ष, साहेबांचे कर्म-धर्म, कतर्ृत्व त्यांचे संदेश, त्यांचे आदेश आणि त्यांचं हृदय, मन आजही बीड जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या तनातनात आणि कणाकणामध्ये कायम असेल. काळाला जेव्हा हे उमजलं तेहा वेळ निघून गेलेली होती. काळालाही आता पश्चाताप होत असेल. साहेबांची त्याच्यासोबत गरज नव्हती, साहेबांची गरज होती ती इथं, महाराष्ट्राच्या मातीला आणि
दिल्लीच्या तक्ताला
उभं आयुष्य सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसासाठी खर्च करणारा हा अनाथाचा नाथ कायम चार दशके सत्तेच्या बाहेर संघर्ष करत राहिला. गोपीनाथ मुंडेंचे सत्य, कर्तृत्व, कर्म कळायला महाराष्ट्राच्या माणसाला 40 वर्ष लागले. शेवटी महाराष्ट्राने आणि देशाने गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न साकार केले. देशात आणि महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणली, दुर्दैवाने सत्तेच्या या हिरवळीवर थकून भागून राहिलेल्या साहेबांना थोडंाही आराम करता आला नाही. परंतु आराम हराम है, हे गोपीनाथ मुंडेंना माहित होते म्हणूनच उभ्या आयुष्यात आराम या शब्दाला स्वत:जवळ कधीच त्यांनी ठेवून घेतलं नाही. अरे ज्या भाजपाला शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखलं जायचं त्या भाजपाला तळागाळातल्या सर्व जात-पात-धर्मातल्या घराघरांमध्ये नेऊन पोहचविणारा हा नाथ जेव्हा सर्वांना अनाथ करून गेला तेव्हा अलगतच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून ‘परत या परत या, साहेब तुम्ही परत,’ या या किणकाळ्या बाहेर पडल्या. गोपीनाथ मुंडे हा एक असा लाव्हा रस होता की तो फक्त नि फक्त सर्वसामान्य माणसाच्या न्यायासाठीच उफळून यायचा. पक्षामध्ये कानकुण झाली, पक्षाने सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष केलं आणि साहेबाने नुसती नाराजगीही दाखविली तर उभा महाराष्ट्र नव्हे तर देश साहेबांच्या नाराजीला बंड म्हणून पहायचा, ही ताकत साहेबांच्या नाराजगीमध्ये होती. विरोधक हा निवडणुकीपुरता असतो हे धोरण साहेबांपेक्षा अन्य राजकारण्यांनी कधीही अंगीकारलेलं नव्हतं.
बीड जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात साहेबांमुळेच अनेक राजकीय विधुरांना कपाली गुलाल लागल्याचंही सांगितलं जातं आणि ते सत्यही आहे. साहेबांबाबत बोलावं तेवढं कमी आहे, लिहावं तेवढं कमी आहे कारण आम्ही सातत्याने म्हणत आलोत साहेब हयात असताना साहेबांच्या विरोधात लिहायचं असेल तर अगोदर 70 टक्के चांगलं लिहावं लागेल तेव्हा कुठं 30 टक्के त्यांच्या त्रुटी लिहिता येतील. जितकी साहेबात दानत, तितकेच साहेब प्रेमळही हे सांगायची, बोलायची आणि लिहायची गरज नाही. लिहायला भरपूर काही आहे, आमच्या वैयक्तिक आठवणीही आज उचंबळून येत आहेत परंतु जो माणूस काळाला स्वत:च्या मिरवणुकीमध्ये नाचवू शकतो त्या माणसाचे कर्तृत्व कर्म आणि संघर्षमय जिवन आम्या पिढीला यशस्वी करून दाखवू शकते एवढेच याठिकाणी सांगू आणि या धिरोदत्ताला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहू.
No comments:
Post a Comment